PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा PM Modi On Delhi Blast : दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही;  दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Modi On Delhi Blast :  दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली काल ( सोमवारी 10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेली. 
ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. 
या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.
PM on Delhi Blast 




(PM Narendra Modi) हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबाबत भाष्य केलं. 
या मागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील,षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, 
आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि जे कोणी यामध्ये सहभागी आहेत, 
त्यांना धडा शिकवला जाईल असं पंतप्रधान भूतानमध्ये म्हणाले आहेत.




दिल्लीतील भीषण घटनेबद्दल गहिवरलेल्या शब्दांत शोक व्यक्त केला आणि पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि आवश्यक ते सर्व निर्देश दिले. 
ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


0 Comments