मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरात

 मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरातांनी सांगून टाकलं 


नाशिकच्या काँग्रेस शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. 


Balasaheb Thorat on MNS Mumbai Alliance 


अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेच्या (Election) निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. 
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणाच आज केली आहे. 
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनीही क मनसेसोबत (MNS) जायचं नाही, अशी काँग्रेसची, वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. 
तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केलं. 
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते आघाडी करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, असे थोरात यांनी म्हटलं. दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



दोन राष्ट्रवादी एकत्र, आमचं काहीही म्हणणं नाही 


दरम्यान, चंदगड येथे दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यासंदर्भात हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवरुन बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, जो राष्ट्रहिताचा विचार करतो तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, 
असं मला वाटतं. त्यामुळे, जर भाजपला दूर ठेवण्यासाठी ते असं करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, 
अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

0 Comments