बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना : आली माहिती समोर

 बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना : आली माहिती समोर


सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या 
भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.



सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंबाजी शेखू चव्हाण (वय 60) बुद्देहाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नय्युम आयुब पठाण (वय 25) राहणार फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे जखमीचे नाव आहे.


बैलगाडा शर्यतीत घडलेल्या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे. 
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या गावातील अंबाजी शेखु चव्हाण हे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले होते.
बाजूला उभे असताना आदत गटातील दोन ते चार बैलगाड्या उधळून मैदानातून बाहेर पडल्या, यामध्ये अंबाजी चव्हाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना


या शर्यतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले आहेत, या अपघातामध्ये 13 ते 15 लोक जखमी झाले आहेत. 
असलेले सर्व वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, जखमींची नावे समोर आली नाहीत पण
यातील नयुम आयुब पठाण असे एका जखमीचे नाव समोर येत आहे

0 Comments