रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी

 रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी :


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी पक्षातील महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या कारणातून पक्षाची प्रतिमा मिलन होत असल्याने रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला
तसेच आमदार अमोल मिटकरी यांना देखील निवृत्ती पदावरून हटवले आहे. हे दोन्ही नेते नाम असल्याचे कळले आहे.


रूपाली पाटील आणि रुपाली चाकणकर 



महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यआणि  रुपाली पाटील यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिलेची बदनामी केल्याचा आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आणि या संघर्षाला तोंड फुटले, अगदी त्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा वापरली. त्याची दखल पक्षाने घेऊन कारवाई केली. व रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले. 


मी दादांशी बोलणार : रूपाली पाटील 


काय म्हणाल्या रुपाली पाटील 

आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत माझ्यासह अमोल मिटकरी आणि वैशालीताई नागवडे यांचे नाव नसल्याचे कळले.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या. कारवाईबद्दल मी अजित पवार यांच्याकडून माहिती घेणार आहे, असे त्या म्हणाल्या.  


मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. असे त्यांनी म्हटले तसेच या यादी बद्दल मा.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असे त्यांनी सांगितले.

0 Comments