विषय ढीग

 

PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही;  दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा

PM Modi On Delhi Blast :  दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली काल ( सोमवारी 10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरून गेली. 
ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. 
या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.
PM on Delhi Blast 




(PM Narendra Modi) हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबाबत भाष्य केलं. 
या मागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील,षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, 
आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि जे कोणी यामध्ये सहभागी आहेत, 
त्यांना धडा शिकवला जाईल असं पंतप्रधान भूतानमध्ये म्हणाले आहेत.




दिल्लीतील भीषण घटनेबद्दल गहिवरलेल्या शब्दांत शोक व्यक्त केला आणि पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ते संपूर्ण रात्रभर तपास यंत्रणांशी संपर्कात होते आणि आवश्यक ते सर्व निर्देश दिले. 
ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


 Bollywood actor Dharmendra passes away : बॉलीवूडची ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन.


 Bollywood actor Dharmendra passes away : 
बॉलीवूडची ही मॅन धर्मेंद्र यांनी मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


Bollywood actor Dharmendra passes away



Bollywood actor Dharmendra passes away : 
बॉलीवूडची ही मेन धर्मेंद्र यांनी आज 10 नोव्हेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 
काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत ही नाजूक असल्याचे वृत्तसमोर आले होते, 31 ऑक्टोंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळ पसरली आहे.





अमेरिकेतून भारतीयांसाठी आनंदाची बातमी , 

टॅरिफ होणार रद्द: ट्रम्प यांची घोषणा. 



अमेरिकेने भारतावर मोठा टॅंकर लावला होता त्यामुळे भारतावर खूप परिणाम झाला होता,
 पण अखेर ट्रम्प यांनी एक गुड न्यूज दिली आहे , त्यांनी भारताच्या टॅरिफबद्दल अत्यंत मोठी घोषणा केली. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत.
त्यांनी सोमवारी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांवर मोठे भाष्य केले.
भारत माझ्यावर सध्या खुश नाहीये. मात्र, पुन्हा एकदा ते मला प्रेम नक्की देतील. 
आमचे पुन्हा एकदा संंबंध चांगले होतील आणि प्रेम वाढेल.




Donald Trump India tarriff 



टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आल्याचे बघायला मिळाले. 
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या केलेल्या विधानावरून त्यांनी भारतासोबतच संबंध सुधारण्याची भाषा तर केलीच शिवाय त्यांनी टॅरिफ कमी करण्याचे थेट संकेत दिले. 
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून संबंध तणावात होती. 
दोन्ही देशांकडून व्यापाराबाबत चर्चा सुरू असून ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास बंदच केली आहे. 
आम्ही भारतावरील टॅरिफ कमी करणार आहोत. कधीही भारतावरील टॅरिफबद्दल घोषणा होऊ शकते. 
भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत आणि दक्षिण आशियासाठीचे विशेष दूत सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारंभात ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आणि भारताच्या टॅरिफबद्दल भाष्य केले.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जात असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. 
आता भारताने रशियाकडू तेल खरेदी जवळपास बंद केल्याने आपण कधीही टॅरिफ रद्द करू शकतो, असे त्यांनी म्हटले. 
काही महिन्यानंतर भारतावरील टॅरिफ कमी करण्याबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले आहेत. 
डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्याहून भारताला सातत्याने धमकावताना दिसले. 
आता त्यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय.

 मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरातांनी सांगून टाकलं 


नाशिकच्या काँग्रेस शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. 


Balasaheb Thorat on MNS Mumbai Alliance 


अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेच्या (Election) निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. 
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणाच आज केली आहे. 
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनीही क मनसेसोबत (MNS) जायचं नाही, अशी काँग्रेसची, वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. 
तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केलं. 
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते आघाडी करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, असे थोरात यांनी म्हटलं. दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



दोन राष्ट्रवादी एकत्र, आमचं काहीही म्हणणं नाही 


दरम्यान, चंदगड येथे दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यासंदर्भात हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवरुन बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, जो राष्ट्रहिताचा विचार करतो तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, 
असं मला वाटतं. त्यामुळे, जर भाजपला दूर ठेवण्यासाठी ते असं करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, 
अशी भूमिका थोरात यांनी मांडली.

 बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना : आली माहिती समोर


सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या 
भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.



सांगली: सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथील माळरानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंबाजी शेखू चव्हाण (वय 60) बुद्देहाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नय्युम आयुब पठाण (वय 25) राहणार फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे जखमीचे नाव आहे.


बैलगाडा शर्यतीत घडलेल्या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे. 
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या गावातील अंबाजी शेखु चव्हाण हे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेले होते.
बाजूला उभे असताना आदत गटातील दोन ते चार बैलगाड्या उधळून मैदानातून बाहेर पडल्या, यामध्ये अंबाजी चव्हाण यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना


या शर्यतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले आहेत, या अपघातामध्ये 13 ते 15 लोक जखमी झाले आहेत. 
असलेले सर्व वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, जखमींची नावे समोर आली नाहीत पण
यातील नयुम आयुब पठाण असे एका जखमीचे नाव समोर येत आहे

Lal Quila Blast Update : 

Dehli Blast News: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने स्फोटासाठी वापरलेल्या 'इको व्हॅन' गाडीचा छडा लावला. हा उच्च तीव्रतेचा स्फोट होता. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.

Lal Quila Blast Update :

जो तो जीव मूठीत घेऊन पळत होता. त्यामुळे या परिसरात एकच तणाव निर्माण झाला. या स्फोटात एकूण 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार कोणती होती? याचा तपास पोलिसांनी लावला आहे

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1जवळ सोमवारी रात्री प्रचंड मोठा स्फोट झाला. प्राथमिक तपासानुसार एका इको व्हॅन (Eco Van)मध्ये हा स्फोट झाल्याचं दिसत आहे. इको व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांनी तात्काळ शोधून काढलं असलं तरी आता ही कार कुणाची आहे? याचा शोध घेतला जात आहे. या स्फोटात जवळच असेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. 

या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून बेचिराख झाली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अत्यंत मोठा होता. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. काही लोकांच्या मते घटनास्थळी रक्ताचे सडे आणि आणि काचांचे तुकडे विखुरलेले होते.. 

 अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र... Ajit Pawar Sharad Pawar 


Kolhapur - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस चे गट एकत्र आले आहेत.

अजित पवार शरद पवार एकत्र 



राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी नको, अशी सूचना केल्याची माहिती समोर आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर परिषदेत अनपेक्षित पण महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे.प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत आघाडी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी चंदगडमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

या आघाडीची मध्यस्थी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. गडहिंग्लज येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार गटाचे राजेश पाटील यांच्यात चर्चा झाली. अखेर दोन्ही राष्ट्रवादी गटांनी भाजपच्या विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेत “शहर विकास आघाडी” जाहीर केली.

चंदगड नगर परिषद निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून, या आघाडीनंतर भाजपसमोर कठीण समीकरण उभे राहिले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकत्र रणांगणात उतरने म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचे संकेत मानले जात आहेत.

 रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी :


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी पक्षातील महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या कारणातून पक्षाची प्रतिमा मिलन होत असल्याने रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला
तसेच आमदार अमोल मिटकरी यांना देखील निवृत्ती पदावरून हटवले आहे. हे दोन्ही नेते नाम असल्याचे कळले आहे.


रूपाली पाटील आणि रुपाली चाकणकर 



महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यआणि  रुपाली पाटील यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिलेची बदनामी केल्याचा आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आणि या संघर्षाला तोंड फुटले, अगदी त्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा वापरली. त्याची दखल पक्षाने घेऊन कारवाई केली. व रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले. 


मी दादांशी बोलणार : रूपाली पाटील 


काय म्हणाल्या रुपाली पाटील 

आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत माझ्यासह अमोल मिटकरी आणि वैशालीताई नागवडे यांचे नाव नसल्याचे कळले.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या. कारवाईबद्दल मी अजित पवार यांच्याकडून माहिती घेणार आहे, असे त्या म्हणाल्या.  


मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत. असे त्यांनी म्हटले तसेच या यादी बद्दल मा.अजितदादाना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असे त्यांनी सांगितले.

 मी मुख्यमंत्री झाले तर ..  अमृता फडणवीस प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले (AMRUTA FADANVIS)



Amruta fadanvis interview - कर्ली टेल्सच्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला त्याचे त्यांनी मजेशीर असे उत्तर दिले, 
तुम्ही जर एक दिवसाच्या मुख्यमंत्री झाला तर काय कराल असा तो प्रश्न होता. त्यावर त्यांनी खूपच मजेशीर असे उत्तर दिले.
" मी सीएम झाले तर कुटुंबीयांसोबत माझा वेळ घालवीन. " 




Amruta Fadanvis interview





मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्या नेहमीच सामाजिक कार्यक्रात सहभाग घेताना पहायला मिळताय. तसंच अनेक वेळा त्या योगासने आणि नवनवीन गाणे म्हणताना सुद्धा पहायला मिळतात. त्या सध्या अमृता फडणवीस वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या आहे.


अमृता फडणवीस या पेशाने एक उत्तर गायिका आहेत. त्याच्या गाण्याची प्रचंड चर्चा होताना पहायला मिळते. त्यांनी गायलेली बरीच गाणी चाहत्यांच्या पसंतीस सुद्धा उतरतात. 
 अशातच द कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला अमृता फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यानी अनेक गोष्टीवर गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी वर्षा बंगल्यावरील किचन क्वीन कोण? पासून ते एक दिवसाची मुख्यमंत्री झाल्यास काय कराल? असा अनेक प्रश्नांची उत्तर मजेशीर दिलीत. Amruta Fadanvis 


मुलाखतीत अमृता फडणवीस यांना 'एक दिवसाची मुख्यमंत्री विचारण्यात आला. 
त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या... देवेंद्रजींनी सगळी कामे चोख केली आहेत, त्यामुळे मला काय करण्याची संधी फार कमी आहे. तसेच त्यांनी भ्रष्टाचाराला पाळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुढे बोलताना अमृता फडणवीस अशा म्हणाल्या की जोपर्यंत ते सीएम आहेत तोपर्यंत भ्रष्टाचार करायला लोक घाबरतात, त्यांना भीती आहे की आपण पकडले जाऊ. तरीही मला एक दिवसाची मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर मी माझ्या पत्नीला आणि मुलीला एखादा छान ठिकाणी नेऊन निवांत वेळ घालवीन.
Newer Posts Home

About us

About विषय ढीग

विषय ढीग हा एक मराठी ब्लॉग आहे, जो तुम्हाला दैनंदिन जीवनाशी संबंधित ताज्या बातम्या, मनोरंजन, हेल्थ टिप्स आणि अपडेट्स मराठीतून देतो. आमचा उद्देश आहे – माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणे.

आमचा उद्देश

आजच्या डिजिटल युगात माहितीचा स्फोट झाला आहे. पण सर्व माहिती विश्वसनीय आणि समजण्यास सोपी नसते. त्यामुळे आम्ही "विषय ढीग" या माध्यमातून दररोजच्या घडामोडी, आरोग्यविषयक सल्ले, बॉलिवूड आणि मनोरंजनाच्या बातम्या तसेच सोशल मीडिया अपडेट्स एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो.

आमचं ध्येय

  • वाचकांना मराठीत ताज्या आणि सत्य माहितीपर बातम्या देणे.
  • आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे.
  • मनोरंजन, संस्कृती आणि नव्या ट्रेंड्सची माहिती पोहोचवणे.
  • वाचकांपर्यंत प्रेरणादायी आणि उपयोगी कंटेंट पोहोचवणे.

आमचं विशेष काय?

  • दैनिक अपडेट्स – रोज नवी माहिती.
  • विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील बातम्या.
  • मनोरंजन आणि हेल्थ दोन्हींचा समतोल कंटेंट.
  • मराठी वाचकांसाठी खास तयार केलेली माहिती.

आमच्याशी संपर्क करा

तुमच्या सूचना, प्रश्न किंवा सहकार्य प्रस्तावांसाठी आम्हाला खालील माध्यमातून संपर्क करा:

Email: contact@vishaydhing.com

Facebook: facebook.com/vishaydhing

Instagram: @vishaydhing

धन्यवाद!
— विषय ढीग टीम 💫

POPULAR POSTS

  • मी मुख्यमंत्री झाले तर - AMRUTA FADANVIS
  • अमेरिकेतून भारतीयांसाठी आनंदाची बातमी , टॅरिफ होणार रद्द: ट्रम्प यांची घोषणा.
  • मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरात
  • रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी
  • Bollywood actor Dharmendra passes away : बॉलीवूडची ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन.
  • Lal Quila Blast Update
  • PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा PM Modi On Delhi Blast : दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
  • बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना : आली माहिती समोर
  • अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र...SHARAD PAWAR AJIT PAWAR
Powered by Blogger

Report Abuse

About Me

विषय ढीग
View my complete profile

PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा PM Modi On Delhi Blast : दिल्लीत झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

By विषय ढीग Published at November 11, 2025
Image

Blog Archive

  • ▼  2025 (9)
    • ▼  November (9)
      • PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडल...
      • Bollywood actor Dharmendra passes away : बॉलीवूडची...
      • अमेरिकेतून भारतीयांसाठी आनंदाची बातमी , टॅरिफ होणा...
      • मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरात
      • बैलगाडी शर्यतीत घडली वाईट घटना : आली माहिती समोर
      • Lal Quila Blast Update
      • अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र...SHARAD PA...
      • रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी
      • मी मुख्यमंत्री झाले तर - AMRUTA FADANVIS

Labels

  • ताज्या घडामोडी
  • देश
  • बातम्या
  • मनोरंजन
  • राजकारण

Labels

  • ताज्या घडामोडी
  • देश
  • बातम्या
  • मनोरंजन
  • राजकारण
  • Home
  • Home

About Blog

Popular Posts

मी मुख्यमंत्री झाले तर - AMRUTA FADANVIS

Image

अमेरिकेतून भारतीयांसाठी आनंदाची बातमी , टॅरिफ होणार रद्द: ट्रम्प यांची घोषणा.

Image

मनसे सोबत युती नाहीच ; बाळासाहेब थोरात

Image

Labels

Designed by OddThemes | Distributed by Blogspot